काव्यलेखन : ग्राहक नसलेली एक उच्चभ्रू टूम
इंग्लिशमध्ये कविता लिहिणे ही चक्क फॅशन आहे. कोणीही उठतो आणि कविता लिहितो, आणि बघताबघता स्वत:ला कवी की हो म्हणवतो! आणि तो कोणीही, आपला हा काव्यगुण प्रस्तुत करण्यासाठी सहज श्रोतृवर्ग मिळवतो. कोणत्याही पार्टीत किंवा समारंभात एखाद-दोन असे कवी भेटतातच. जे एखाद्या ‘योग्य’ आणि या कवितांतील खोल अर्थ समजून घेऊ शकणाऱ्या संवेदनक्षम प्रकाशकाच्या शोधात असतात.......